Wednesday, March 24, 2021

लॉकडाऊनला वर्ष झाल्याच्या निमित्ताने…

जगात सगळीकडे कोविड १९ चा धुमाकूळ चालू होता, भारतातही तो पसरायला सुरुवात झाली होती आणि आता कधीही देशभर लॉकडाऊन जाहीर होईल अशी चिन्हं दिसत होती.  १५ मार्चला आम्ही सगळ्यांनी घरूनच काम करायचा निर्णय घेतला आणि १७ मार्चपासून Work from home ची सुरुवात झाली. २४ मार्च २०२० ला भारतात पहिल्यांदा संपूर्ण देशात कोणालाही कुठेही बाहेर पडण्यासाठी बंदी घातली गेली. त्या बंदीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या वर्षीचा घेतलेला हा आढावा.

Friday, March 5, 2021

मोगलीच्या जंगलात - पेंच अभयारण्यात

डिसेंबर २०२० मध्ये पुन्हा एकदा जंगलात जायचा विचार सुरू झाला. यावेळी श्राव्याला पहिल्यांदाच जंगलात घेऊन जायचं म्हणून वेगळा उत्साहही होता. आदित्य, गिरिजा, प्रणवची ठरलेली एक जंगल सहल, २०२० च्या लॉकडाऊनमुळे घडली नव्हती. आम्ही त्यांना चिडवत होतो, आम्हाला सोडून जाणार होतात त्यामुळे लॉकडाऊन झाला, म्हणून आम्ही असताना जाऊया :). शेवटी ओंकार बापट (Wildlife Unlimited) बरोबर पेंचला जायचं नक्की झालं आणि त्याप्रमाणे कोण कोण येणार आणि वेळेत तिकीटे काढणं वगैरे विचार, चर्चा सुरू झाल्या.

जानेवारी २०२१ संपता संपता आदित्य, गिरिजा, प्रणव, श्राव्या, पार्थ, मी, सत्यजित आणि संहिता असे सगळे जायचं ठरवलं.

फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा एकदा कोविडला उधाण आलं आणि लॉकडाऊनचं सावट आलं. लॉकडाऊन होणार का नाही, कुठे होऊ शकतो, आम्हाला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात जायचं असल्याने कोविड चाचण्या कराव्या लागणार का नाही असे सगळे प्रश्न निघायच्या ४ दिवस आधी उभे रहायला लागले. संहिताला आयत्यावेळी काही कारणानी येता येणार नाही असं कळलं. शेवटी २ दिवस आधी कोविड चाचण्या करून, सगळ्यांच्या प्रकृती उत्तम आहेत याचे दाखले घेऊन, आम्ही २६ फेब्रुवारीला पुण्याहून पेंचला जायला निघालो.